स्व. श्री देवरावजी विðलराव आसोले
(जन्म:1सप्टेंबर1943, मृत्यु: 21 फेब्रुवारी 2011)
जन्मठिकाण: जुनीकामठी, ता. पारशिवनी, जि. नागपूर.
शिक्षण: बी.काॅम. (नागपूर विद्यापीठ)
समाजकार्य: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. जनसंघ ते भारतीय जनता पार्टी मध्ये राजकीय वाटचाल. आणिबाणी विरोधी आंदोलनात सहभागी होवून 52 दिवस तुरूंगवास भोगला. पारशिवनी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते. शेतकरी संघर्ष समिती स्थापना करून शेतक-यांकरिता अनेक आंदोलने व न्यायाकरिता सतत संघर्षरत होते. सन 1999 ते 2004 सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार होते.
”समाज महर्षि“ डाॅ. गंगाधर निळकंठराव बोबडे
जन्म तारीख : 12 मे 1944
जन्मस्थान : बोरगावं, ता. सौंसर, जि. छिंदवाडा (म.प्र.)
निवासस्थान : 68, अंबाझरी ले आऊट नागपूर 440033
मोबा.क्रमांक:8788903121, 9890471674
शिक्षण : एम.एस.सी.(कृषी), पी.एच.डी.
शालेय शिक्षण बोरगावं, दादासाहेब धनवटे नगर विद्यालय नागपूर, कृषी महाविद्यालय नागपूर.
नोकरी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. कृषी विद्या शाखेतुन प्राध्यापक म्हणून 37
वर्षाच्या सेवेनंतर 2000 साली निवृत्त.
समाजकार्य : पूर्वीपासून समाजकार्याची आवड. 1972 साली ”राष्ट्रीय सेवक मंडळ नागपूर“ या नावाने समाजाची संस्था रजीस्टर केली. संस्थेचे पहीले सचिव म्हणून कार्य केले. 1974 साली सुयोग नगर गृहनिर्माण संस्थेची स्थापना झाली व उपाध्यक्ष म्हणून कार्य केले. अंदाजे 600 समाज बांधवांना सभासद करून घेतले. त्यांना भुखंड उपलब्ध करून दिल्याने त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. याच संस्थेतून 1978 साली समाजाकरिता 4500 चै.फुटाचा भुखंड राखीव करून घेतला. पुढे हाच भुखंड ”राष्ट्रीय सेवक मंडळ नागपूर“ चे नावाने खरेदी करण्यात आला. राष्ट्रीय सेवक मंडळाकडून नविन कार्यकारी मंडळास रितसर चार्ज न मिळाल्यामुळे 1994 साली अखिल भारतीय धनोजे कुणबी समाज नागपूर ची स्थापना करावी लागली व या संस्थेचा अध्यक्ष म्हणून 16 वर्ष कार्य केले.